19 December, 2022

 

नेहरु युवा केंद्राच्या वतीने विजय दिवस साजरा

 


हिंगोली (जिमाका), दि. 19 : 16 डिसेंबर 1971 रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतात 93 हजार पाकिस्तानी सैनिकांनी शरणागती पत्करली व भारताचा विजय झाला. यामध्ये भारताचे बरेच सैनिक/जवान शहीद झाले. त्या विजयाची आठवण म्हणून 16 डिसेंबर हा दिवस भारतात दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून नेहरु युवा केंद्र हिंगोली युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत तालुक्यातील हट्टा गावामध्ये निंबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गावातील अनेक युवा, युवती,  विद्यार्थीने स्पर्धेमध्ये सहभाग नोदविला. या स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय असा क्रमांक काढून विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पिरालाल राठोड, भगवान शिंदे, शिवाजी खाडे, भिसे उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी युवकांना आपल्या सैनिकाविषयी माहिती दिली आणि सैनिकाचे आपल्या देशाप्रती असलेली देशभक्ती प्रेम या विषयी माहिती सांगितली.

यावेळी युवा, युवती, गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन नेहरु युवा केंद्राचे तालुका समन्वयक अजय धोतरे, सुदर्शन राठोड यांनी केले.

 

****

No comments: