बांधकाम कामगारांनी नोंदणी, नुतनीकरण व विविध योजनेच्या लाभासाठी
दलालापासून सावध राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 16 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळ मुंबई अंतर्गत येथील सरकारी कामगार अधिकारी
यांच्या कार्यालयात बांधकाम कामगारांचे नोंदणी, नुतनीकरण व विविध योजना अंतर्गत
इतर लाभ वाटपाचे काम सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामार्फत चालते. तसेच
अत्यावश्यक संच, सुरक्षा संच वाटपाचे काम चालते. या कामकाजासाठी कोणत्याही खाजगी
प्रतिनिधी अथवा एजंट/दलाल यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. बांधकाम कामगारांनी
इतर कोणत्याही खोट्या अमिषाला बळी न पडता नोंदणी व नुतनीकरण करुन घ्यावे. याबाबत
आपली फसवणूक झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही. अतिरिक्त रक्कम मागणी करणाऱ्या
व्यक्तीविरुध्द नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये परस्पर तक्रार नोंदवावी, असे आवाहन
सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे.
संबंधित कामगारांना अर्ज नोंदणीसाठी व नुतनीकरणासाठी वार्षिक एक
रुपया फीस आकारण्यात येत असून त्याची रितसर पावतीही देण्यात येते. या व्यतिरिक्त
या कार्यालयाकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही, अशी माहिती सरकारी
कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी दिली आहे.
****
No comments:
Post a Comment