पारधी जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत अर्ज
करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 12 : पारधी योजना सन 2020-2021 अंतर्गत पारधी जमातीच्या हिंगोली
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
देण्यासाठी लाभार्थ्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली या
कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छूक लाभार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी परिपूर्ण
कागदपत्रासह दि. 30 डिसेंबर, 2022 रोजी सांयकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली या कार्यालयात
सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी,
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
पारधी समाजातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणे ही
योजना वैयक्तिक स्वरुपाची असून लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 30 वर्षे असणे
आवश्यक आहे. किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे
प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे रहिवाशी प्रमाणपत्र, तहसीलदार यांचे सन 2022-23 च्या
उत्पनाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, नजीकच्या काळातील दोन
पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड आदी कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
वरील योजना रद्द, बदल करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक
आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी यांनी राखून ठेवलेले आहेत.
*****
No comments:
Post a Comment