26 December, 2022

 

शालेय विभागस्तराच्या कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात परभणीचे वर्चस्व


 

हिंगोली (जिमाका), दि. 26 : शालेय विभागीय स्तरावरील कबड्‌डी स्पर्धेत तीनही वयोगटात परभणी जिल्ह्याने अंजिक्यपद पटकाविले आहे. चौदा वर्ष मुली, सतरा वर्ष मुली व एकोणवीस वर्ष मुली या तीनही गटामध्ये परभणीने विजय मिळविला आहे. 

हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवार, दि. 25 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विभागस्तरावरील कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धा तीन मैदानावर खेळविण्यात आल्या. वयोगट 14 वर्ष मुलींमध्ये औरंगाबाद ग्रामीणचा परभणीच्या संघाने पराभव करुन विजेते पद मिळविले. 17 वर्ष मुलींमध्ये प्रथमस्थानी परभणीचा संघ तर उपविजेता जालन्याचा संघ राहिला. 19 वर्ष मुलीच्या कबड्डी स्पर्धेत विजेते पद परभणी संघाने पटकाविले तर द्वितीय स्थानावर औरंगाबाद मनपा राहिला. या स्पर्धेत तीन गटामध्ये एकूण 20 संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघाचा जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा आयोजन समिती प्रमुख मेजर प्रा.पंढरीनाथ घुगे, आयोजन समिती समन्वयक कल्याण देशमुख, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रा.नवनाथ लोखंडे, क्रीडा अधिकारी बस्सी, संजय बेत्तीवार, खो-खो असोसिएशनचे सचिव प्रा.नरेंद्र रायलवार, पंचप्रमुख विशाल शिंदे यांनी सत्कार केला.

स्पर्धा यशस्वीतेसाठी विशाल शिंदे, संजय भुमरे, मेहरज खॉ पठाण, केशव पारटकर, ईस्माईल पठाण, गजानन कोकाटे, दत्तराव बांगर, जाफर खान पठाण, दिलीप गव्हाणे, दिगंबर कापसे, बालाजी नरोटे, रावसाहेब गेंडाफुले, बाळु जाधव, गजानन राठोड, सुनिल सुकने, संतोष सोनपावले, डॉ.शिवशंकर कापसे, मोतीराम कोरडे, पारटकर, प्रभाकर काळबांडे, माधव चव्हाण, कल्याण पोले, नाईक, एच.एल.सावंत यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा कबड्‌डी असोसिएशन, तालुका खो-खो असोसिएशन यांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. मैदानावर क्रीडा प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती. 

******

No comments: