सामाजिक न्याय समता
पर्व निमित्ताने
संविधान जागर व
सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
हिंगोली (जिमाका),दि. 06 : सामाजिक न्याय व
विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06
डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता
पर्व" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले असून त्याचाच एक भाग म्हणून सोमवार, दि. 05 डिसेंबर, 2022 रोजी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद
मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली समता
पर्वा निमित्त येथील गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे संविधान जागर व सांस्कृतिक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त उमेश सोनवणे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तान्हाजी
मुटकुळे हे उपस्थित होते. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी विक्रम
जावळे, दिवाकर माने, मिलींद मोरे, मिलींद उबाळे, रवि वाढे, सुनिलभाऊ देवडा,
हर्षवर्धन परसावळे, सुरेशप्पा सराफ, जगजीत खुराणा, के.के.शिंदे, ज्योतीपाल रणवीर,
पडघन गुरुजी, सुनिल इंगोले, विशाल इंगोले, अनिल भारुका, सुनिल देवरे, चक्रपाणी
गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते संविधान उद्देशिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या
प्रतिमेचे पुष्प पूजन करुन अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात संविधान जागर व
सांस्कृतिक कार्यक्रम स्वरगंधार संचाचे संतनु पोले यांनी सांयकाळी 6.30 ते 10.45
पर्यंत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व संविधानावर आधारित
पोवाडे, गीत गायन करुन हिंगोलीकराना भारावून टाकले. या कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणात
जनसामान्य नागरिकांनी संविधानावर आधारित पोवाडे व गीतगायनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याणचे
सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी
केले. सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन सिध्दार्थ गोवंदे
यांनी केले.
*****
No comments:
Post a Comment