13 December, 2022

 

महामार्गावर चालणाऱ्या दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरुनच वाहन चालवावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

* हेल्मेट न वापरता दुचाकी वाहन चालवणाऱ्या वाहनचालकावर कारवाई करण्याचे निर्देश

 



             हिंगोली (जिमाका), दि. 13 : महामार्गावर चालणाऱ्या दुचाकी वाहन धारकाने हेल्मेट वापरुनच वाहन चालविण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प अधिकारी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जे वाहनधारक दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरणार नाहीत अशा वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे परिवहन विभाग व पोलीस विभाग यांना निर्देश दिले. तसेच हिंगोली जिल्ह्यातील विविध अपघाताचे बॅल्क स्पॉटला व जिथे अपघात होऊ शकतात, असे संवेदनशील स्पॉटस यांचा आढावा घेण्यात आला. या स्पॉटवर अपघात न होण्याचा दृष्टीने करावयाच्या विविध उपाययोजना करण्याचे निर्देश संबधित विभागास दिले.

या बैठकीमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या अपघातामध्ये मोटार सायकल वाहन चालकाचे अपघात जास्त प्रमाणात होत आहे. हे अपघात हेल्मेट न वापरल्यामुळे होत आहेत. त्यामुळे मृत्युचे प्रमाण अधिक आहे,अशी बाब निर्देशनास आणून दिली.

 

*****

No comments: