आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित
आश्रमशाळा, विनाअनुदानित शाळा, जिल्हा परिषद शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सन
2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी व 9 वी मध्ये शिकत असलेल्या
अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील
केंद्र शासनाद्वारे संचलित शासकीय एकलव्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासनाने प्रवेश
पात्रता परीक्षा आयोजित केलेली आहे. ही परीक्षा दि. 26 फेब्रुवारी, 2023 रोजी
घेण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा
विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रवेश अर्ज प्राप्त
करुन घ्यावा व सदर अर्ज भरुन मुख्याध्यापक यांच्याकडेच द्यावा.
सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी अनुसूचित जमाती, आदिम जमातीच्या
विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी प्रोत्साहित करावे. प्रवेश पात्रता
परीक्षेचे आवेदन पत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकलप कार्यालय कळमनुरी जि.हिंगोली
येथून प्राप्त करुन घ्यावेत. आवेदन पत्र शासकीय आश्रमशाळा, जामगव्हाण, गोटेवाडी,
बोथी, पिंपळदरी, शिरडशहापूर येथे उपलब्ध आहेत.
प्रवेश पात्रता परीक्षेसाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख
रुपयापेक्षा जास्त नसावे. सक्षम अधिकाऱ्यांचे दिलेले अनुसूचित जमाती, आदिम जमातीचे
प्रमाणपत्र (छायांकित प्रत), पालकाचे रहिवाशी प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचे शाळेचे
बोनाफाईड आवश्यक आहे.
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन
पत्र दि. 10 फेब्रुवारी, 2023 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.
हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment