मानवी हक्क दिवस साजरा करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 09 : मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये
मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य
भाग आहे. या कायद्यांतर्गत य समाजातील तळागाळापर्यंत जनतेला मानवी हक्काचे ज्ञान
माहिती होणे व त्याबद्दल जनजागृती होण्यासाठी कार्यक्रमाची प्रभावी आयोजन करणे
आवश्यक आहे.
या वर्षी मानवाधिकारांच्या सार्वत्रिक घोषणेचा 75 वा
वर्धापन दिन आहे. या वर्षाच्या मानवी हक्क दिनाची घोषणा ‘‘This years Human Rights
Day Slogan is Dignity, Freedom and Justice for All’’ असून कृती संदेश ‘‘Stand Up
For Human Rights’’ अशी आहे.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दि. 10 डिसेंबर, 2022 रोजी
मानवी हक्क दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने सर्व संबंधित
विभागाने दि. 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा
प्रशासनातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment