दत्तक नियमावली सुधारणेच्या अनुषंगाने दत्तक प्रक्रियेविषयी
जनजागृती
हिंगोली
(जिमाका), दि. 12 :
दत्तक नियमावली-2022 च्या झालेल्या सुधारणेच्या अनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत
जिल्हा बाल संरक्षण कक्ष हिंगोली कडून बालकासंदर्भात आणि बालकाशी निगडीत विविध विषयावर
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा महिला व
बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी
सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार दत्तक नियमावली-2022 च्या झालेल्या सुधारणेच्या
अनुषंगाने कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालय
व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात दत्तक प्रक्रियेविषयी जनजागृती
कार्यक्रम घेण्यात आला आहे. यावेळी सदरील विभागातील अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित
होते.
त्याअनुषंगाने यावेळी बालकासाठी असणारे कायदे, यंत्रणा
इत्यादी संदर्भात जनजागृती करण्यात आली. महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात
येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच जिल्ह्यात कायदेशीर दत्तक प्रक्रियेची
जाणीव जनजागृती करण्यात आली आहे. दत्तक विधान नियमावली 2022 नुसार मूल दत्तक घेण्याची
प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. मूल दत्तक घेण्यासाठी दत्तक घेणारे पालकांनी कायदेशीर
बाळ दत्तक घेण्यासाठी सेंट्रल ॲडॉपशन रिसोर्स ॲथारिटी यांच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करुन
कायदेशीररित्या बाळ दत्तक घेता येते. अवैध पध्दतीने बाळ दत्तक घेतल्यास संबधितावर गुन्हा
नोंद होऊ शकतो. तसेच जिल्हयात एखादे निराधार, अनाथ, बेवारस मुल, सापडलेले बालक किंवा
एखादी कुमारी माता, विधवा माता असेल व तिला नुकतेच जन्मलेले बाळ नको असेल तर आपण मा.बाल कल्याण समिती हिंगोली, जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी कार्यालय हिंगोली व चाईल्ड लाईन (1098) यांना संपर्क करुन
त्यांची मदत करु शकता, अशी माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे,
बाल संरक्षण अधिकारी (संस्था बाह्य)
जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद
मुडे यांनी दिली.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकलप
विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी बी. के. गायकवाड, यु. ए. कोंडूरवार, सहायक प्रकल्प
अधिकारी (शिक्षण) आर. बी. शेळके, कार्यालयीन अधीक्षक आर. एन. भोसले तसेच कळमनुरी उपजिल्हा
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद मेने, डॉ.हजारे, डॉ.बोडेवार आदी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment