जिल्हा तंबाखू
नियंत्रण पथकाची 21 पान टपऱ्यांवर धडक कार्यवाही
हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या निर्देशानुसार सर्व
शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश
दिले होते. त्यानुसार आज दि. 22 डिसेंबर, 2022 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा
शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सुचने नुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण
पथकाद्वारे औंढा (ना) येथे बसस्टँड परिसरातील पान टपऱ्यांवर धाडी टाकण्यात आल्या.
तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक
परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे, व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. औंढा
(ना) येथे बसस्टँड व मंदिर परिसरात ह्या कायद्याचे
उल्लंघन होताना सर्रास दिसते. औंढा पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक व्हि. के. झुंजारे यांच्या सहकार्याने बीट जमादार इम्रान पठाण, संदीप
टाक, मराठवाडा ग्रामीण संस्था, औरंगाबादचे अभिजित संघई, व जिल्हा रुग्णालया तर्फे आनंद
साळवे, कुलदीप केळकर व इतर कर्मचारी ह्यांच्या पथकाने परिसरातील ठिक-ठिकाणी उलघाल करणाऱ्या पान टपऱ्यांवर
दांडात्मक कार्यवाही केली. ह्या कार्यवाहीत एकूण 21 लोकांकडून रु. 10650/- एवढा दंड
वसूल करण्यात आला.
कोटपा 2003 च्या
नुसार कलम 4 - सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे. कलम 5 - तंबाखूयुक्त पदार्थ
जाहिरात बंदी. कलम 6 - 'अ' 18 वर्षा
खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई. कलम 6 'ब' शैक्षणिक संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त
पदार्थ विक्री, सेवन बंदी तर कलम 7 - अन्वये कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर
(पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 % भागावर असावी.
******
No comments:
Post a Comment