हिंगोली जिल्ह्यात रब्बी
हंगामासाठी 12 हजार 270 मे.टन युरिया खताचे आवंटन मंजूर
एमआरपीपेक्षा जादा दराने युरिया खताची विक्री करु
नये
हिंगोली (जिमाका), दि. 06 : रब्बी हंगाम सन 2023-24 मध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी 70 हजार 206
मे.टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने कृषि आयुक्तालयांने
हिंगोली जिल्ह्यासाठी 43 हजार मे.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर केले आहे.
रासायनिक खतांच्या एकूण मंजूर आवंटनापैकी रब्बी हंगाम 2023-24 मध्ये हिंगोली
जिल्ह्यासाठी 12 हजार 270 मे.टन युरिया खताचे आवंटन मंजूर करण्यात आले असून चालू
हंगामात आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात 7 हजार 234
म्हणजे 60 टक्के मे. टन युरिया खताचा पुरवठा झालेला आहे. सद्यस्थितीत
पीओएसवरील ऑनलाईन युरिया खताचा सुमारे 3 हजार मे. टन शिल्लक साठा हिंगोली
जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे दिसून येते.
तसेच दि. 5
डिसेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्यात आसीएफ 1289 मे.टन व आयपीएल 130 मे.टन असा
एकूण 1418 मे. टन युरिया हिंगोली जिल्ह्यात प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात औंढा
नागनाथ तालुक्यासाठी 220 मे.टन, वसमत 341 मे.टन, हिंगोलीसाठी 331 मे.टन,
कळमनुरीसाठी 316 मे.टन व सेनगाव तालुक्यासाठी 210 मे.टन याप्रमाणे तालुकानिहाय
प्राप्त झालेल्या युरिया खताचा तपशील प्राप्त झाला आहे.
या व्यतिरिक्त
आयएफएफसीओ कंपनीच्या नॅनो युरिया मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी
नॅनो युरियाचा वापर करण्याचे आवाहन यापूर्वी अनेकवेळा कृषि विभागाकडून करण्यात
आलेले आहे.
मागील काही
दिवसांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील हरभरा, रब्बी ज्वारी व
गहू या पिकांच्या पेरणीस वेग आला आहे. तसेच ऊस पिकासाठी युरिया खताची आवश्यकता
असल्यामुळे सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात युरिया खताची मागणी करीत आहेत.
बाजारात युरिया
खताची व नॅनो युरियाची आवश्यक त्या प्रमाणात उपलब्धता असतांना रासायनिक खत
विक्रेते शेतकऱ्यांना जादा दराने युरिया खताची विक्री करीत असल्याच्या बातम्या
वर्तमानपत्रातून येत आहेत. त्यामुळे रासायनिक खत विक्रेत्यांनी एमआरपी दरानेच
शेतकऱ्यांना युरिया खताची विक्री करावी. तसेच युरिया सोबत इतर कोणत्याही अनावश्यक
कृषि उत्पादनांची खरेदी करण्याची सक्ती करु नये, अशा सूचना मोहिम अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांनी
दिल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment