अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी
सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी
विशेष मोहिम
* राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रती थेंब अधिक पीक योजनेंतर्गत
अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली
(जिमाका), दि. 15 : राष्ट्रीय
कृषि विकास योजना-प्रती थेंब अधिक पीक 2023-24 अंतर्गत शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार
सुक्ष्म सिंचन संचासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 18 डिसेंबर ते दि. 31
डिसेंबर, 2023 या पंधरवाड्यात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित
जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलचे संकेतस्थळावर
अर्ज करावेत. महाडीबीटी पोर्टलवर राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रती थेंब अधिक पीक
2023-24 अंतर्गत शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार सुक्ष्म सिंचन संच या सदराखाली नोंदणी
करावी. महाडीबीटी पोर्टलच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी स्वत:च्या मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक
सेवा केंद्र इत्यादी माध्यमातून महाडीबीटीच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावेत व
जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी कृषि विभागाच्या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी
गावच्या कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी
कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment