जागतिक दिव्यांग उत्साहात
साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 04
: हिंगोली
शहरांमध्ये 3 डिसेंबर दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून जिल्हा परिषदेच्या समाज
कल्याण विभागामार्फत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामध्ये हिंगोली शहरातील
दिव्यांग शाळा व वस्तीगृहातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या सहभागाने दिव्यांग
जागृती रॅली काढण्यात आली. दि. 3 डिसेंबर,
2023 रोजी सकाळी डॉक्टर हेलन केलर व लुई ब्रेल
यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी
दिव्यांग जागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून
सुरुवात झाली.
ही रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानंतर
शिवाजीनगर-जिल्हा परिषद मार्गे नवीन जिल्हा परिषदेमध्ये आली व सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक सल्लागार
प्रशांत वैद्य, कार्यालयीन अधीक्षक राऊत, मुंडे, कंधारकर, राठोड, पांचाळ, असोले, बागल,
रंगनाथ मुटकुळे, गडदे तसेच ही रॅली यशस्वी होण्यासाठी शहरातील दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक
आशिष पिंगळकर, राजकुमार झगडे, माधव शिंदे, पाटील, गव्हाणे, चव्हाण यांनी मोलाचे सहकार्य
केले. त्यांच्या मदतीला त्यांच्या शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग सोबत होते.
******
No comments:
Post a Comment