विकसित भारत संकल्प
यात्रेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
·
विकसित भारत संकल्प
यात्रेच्या माध्यमातून गावोगावी केला जात आहे कल्याणकारी योजनांचा जागर
हिंगोली (जिमाका), दि. 12 : 'विकसित भारत
संकल्प यात्रा' आज हिंगोली तालुक्यातील वैजापूर व घोटा, कळमनुरी तालुक्यातील जांब
व तेलंगवाडी, औंढा तालुक्यातील देवळा व पांगरा लाख, सेनगाव तालुक्यातील गुगळपिंप्री
व माहेरखेडा , वसमत तालुक्यातील कुरुंदा व महमदापूरवाडी येथे पोहचली आहे. शासनाच्या
वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी,
कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे.
या संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन शासनाच्या विविध कल्याणकारी जागर करण्यात येत आहे. या संकल्प यात्रेला
जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी या विकसित भारत संकल्प
यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना,
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन,
कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी
योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत
असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित
लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. तसेच 'आपला संकल्प, विकसित भारत' या
एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या.
हिंगोली तालुक्यातील वैजापूर येथील कार्यक्रमाला सरपंच पुष्पा
बनसोडे, उपसरपंच केसरबाई डांगे, ग्रामसेवक गजानन वसू, तलाठी नवनाथ वानोळे, आशा
वर्कर सुनिता डांगे यांच्यासह गावातील लाभार्थी, नागरिक उपस्थित होते. तसेच घोटा
येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, नागरिक उपस्थित होते. यावेळी वैजापूर येथील भगवान
काशिराम डांगे यांनी आयुष्यमान भारत योजनेतून मोफत उपचार मिळाल्यामुळे शासनाचे
आभार मानून या योजनेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले.
सेनगाव तालुक्यातील गुगुळपिंप्री येथील कार्यक्रमाला सरपंच सौ.
रेखा खोडे, उपसरपंच संजय पोफळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आशावर्कर व गावातील
नागरिक उपस्थित होते. तर माहेरखेडा येथे सरपंच सौ. अर्चना शिरसाट, उपसरंपच सुजाता
ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य विद्या शिरसाट, चंद्रभागा उचित, ग्रामसेवक मुळे,
आशावर्कर, गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत
कार्डाचे व आधार कार्डाचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी आरोग्य तपासणी, उज्वला
गॅस योजना लाभ, किसान सन्मान, स्वनिधी योजना, जनधन योजना इत्यादी लाभ देण्यात आला.
तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील देवळा व पांगरा लाख, कळमनुरी तालुक्यातील जांब व तेलंगवाडी, वसमत तालुक्यातील
कुरुंदा व महमदापूरवाडी येथे गावाचे संरपच, ग्रामसेवक, तलाठी, ग्रामपंचायत सदस्य,
पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment