06 December, 2023

 

औंढा नागनाथ व हिंगोली तालुक्यातील सर्व दारु दुकाने

दि. 7 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश

 

 

                हिंगोली (जिमाका), दि. 06 :  सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार, दि. 7 डिसेंबर, 2023 रोजी  डिग्रस पाटी ता.जि. हिंगोली येथे श्री. मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवार, दि. 7 डिसेंबर, 2023 रोजी  फक्त औंढा नागनाथ व हिंगोली तालुक्यातील सर्व प्रकारच्या ठोक व किरकोळ देशी, विदेशी मद्य विक्री (एफएल-2, एफएल-बीआर-2, एफएल-3, सीएल-3) व ताडी अनुज्ञप्त्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे (कोरडा दिवस)  आदेश दिले आहेत.

            या आदेशाचा भंग केल्यास अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई दारुबंदी कायदा 1949 कलम 54 व 56 अंतर्गत कडक करण्यात येईल याची संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.

**** 

No comments: