30 December, 2023

 

औंढा नागनाथ शहरात विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम

 

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्यासाठी संकल्प करावा

- केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव

 






हिंगोली (जिमाका), दि. 30 :   विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आपल्याला देशाला पुढे न्यावयाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय कामगार व रोजगार आणि पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी औंढा नागनाथ येथे विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केले.

औंढा नागनाथ येथे विकसित भारत संकल्प याञा कार्यक्रमाचे आयोजन आज याञा मैदानात करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार तानाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, नगराध्यक्षा  सपना  प्रदीप कनकुटे, उपनगराध्यक्ष दिलीप राठोड, शिवाजीराव जाधव, रामदास पाटील सुमठाणकर, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ, उमाकांत पारधी, तहसीलदार विठ्ठल परळीकर उपस्थित होते.   

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले, विकासाची गंगा सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. देशाचा विकास हा महिला आधारित विकास असला पाहिजे त्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. यासाठी बचतगटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविले पाहिजे. सामान्य माणूस हा आर्थिक सत्तेशी जोडला गेला पाहिजे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आपल्याला देशाला पुढे न्यावयाचे आहे. यासाठी आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे, असे आवाहन यावेळी केंद्रीय मंत्री भूपेंद यादव यांनी केले .

              यावेळी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले. सूत्रसंचालन  प्रा.वसंत गाडे तर आभार प्रदर्शन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले.

यावेळी विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात केंद्रीय मंञ्याच्या हस्ते केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या 170 लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात महिला बचतगट, शिक्षण विभाग, कृषी विभाग, बाल विकास प्रकल्प विभाग , पुरवठा विभाग , नगरपंचायत विभाग , पशुसंवर्धन विभाग , हळद संशोधन केंद्र विभाग , आरोग्य विभाग, रोजगार हमी विभाग , तालुका आरोग्य विभाग, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय, वन कार्यालय यांनी विविध योजनेची माहिती दर्शविणारे स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच स्वतः तयार केलेल्या  वस्तूचे देखील या ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. या सर्व स्टॉलला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

या कार्यक्रमास रामदास पाटील सुमठाणकर नायब तहसीलदार वैजिनाथ भालेराव, लता लाखाडे, गटविकास अधिकारी बाळासाहेब गोरे, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी संगिता इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनुराधा गोरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ.गजानन हरण, वनपरिक्षेञ अधिकारी कुंडलीक होरे, वनपाल संदीप वाघ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी श्री नागनाथ मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी श्री नागनाथ देवस्थानच्या वतीने त्यांचा श्री नागनाथ मंदिराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

*****

No comments: