कामाच्या
ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियमांतर्गत
सखी
वन स्टॉप सेंटर येथे एक दिवशीय कार्यक्रम साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी दि.
9 डिसेंबर, 2013 रोजी कामाच्या ठिकाणी
महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंमलात आला
आहे.
भारतीय संविधानानुसार महिलांना समानतेचा, सन्मानाने जगण्याचा तसेच
कोणताही व्यापार, व्यवसाय करण्याचा व लैंगिक छळापासून मुक्त सुरक्षित कार्य
वातावरणाचा अधिकार आहे. अधिकाधिक महिलांना आर्थिक उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी
प्रोत्साहित करण्यासाठी महिलांचा सन्मान राखण्याची तसेच या कायद्याच्या तरतुदीचे
पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक नियोक्त्याची आहे. त्याअनुषंगाने महिला व
बालविकास मंत्रालयाने या महत्वपूर्ण काययद्याच्या अधिसूचनेनुसार दि. 9 डिसेंबर,
2023 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या येथील सखी वन
स्टॉप सेंटरवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी माया सुर्यवंशी यांच्या
अध्यक्षतेखाली कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013
एक दिवशीय कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी ॲड. जयश्री सावरगावे व ॲड. वैशाली देशमुख यांनी कामाच्या
ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 या विषयावर
विचार मांडले. अंतर्गत तक्रार समितीची रचना, सदस्यांची पात्रता, तक्रार कशी व
कुणाकडे करावी तसेच कायद्याचा योग्य वेळी वापर व दुरुपयोग याविषयी विचारपुष्प
गुंफले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रिती सैदाणे यांनी केले. तर
शिलाताई रणवीर यांनी आभार मानले.
यावेळी परिविक्षा अधिकारी सुनिल वाठोरे, बाल कल्याण समितीच्या
सदस्या बाली भोसले, ॲड. एस. डी. घोडगे, ॲड, अनिता दत्ताजी जमधाडे, पोलीस अधीक्षक
कार्यालयातील प्रिया देवराव जाधव, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक शिलाताई
रणवीर, धम्मज्योती वाघमारे, पॅरा मेडिकल पर्सन, सखी वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी, आशा
स्वयंसेविका, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
*******
No comments:
Post a Comment