मोटार
सायकल संवर्गासाठी नवीन मालिका चालू
हिंगोली (जिमाका), दि. 28 : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील यापूर्वीची मोटारसायकल
संवर्गासाठीची एमएच-38-एएफ ही मालिका संपुष्टात आल्यामुळे मोटार सायकल संवर्गासाठी
एमएच-38-एजी-0001 ते 9999 ही नवीन मालिका सुरु केली आहे.
ज्या वाहन मालकांना वाहनासाठी आकर्षक क्रमांक राखीव करावयाचा आहे.
त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून आपला आकर्षक क्रमांक विहित
शासकीय शुल्क भरुन राखीव करुन घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता
जोशी यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment