जिल्हाधिकारी
कार्यालयात ध्वजदिन निधी संकलनाला प्रारंभ
माजी सैनिकांच्या
समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द
--
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने
हिंगोली (जिमाका), दि. 07 : देशात शांतता व अखंडता टिकवून ठेवण्याचे काम सीमेवरील सैनिकांनी
स्वत:च्या शौर्याने, धैर्याने कमीत कमी साधनसामग्रीद्वारे चांगल्या प्रकारे करत
आहेत. आपल्या कुटंबियांची पर्वा न करता अविरतपणे सेवा करत आहेत. आपल्या सैनिकांचा
जगात मान आहे. त्यामुळेच आपण सुखी जीवन जगत आहोत, असे सांगून
माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याचे सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी सभागृहात आज सशस्त्र सेना
ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी संजय दैने बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा नियोजन
अधिकारी सुधाकर जाधव यांची उपस्थिती होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने पुढे म्हणाले, या सर्व सैनिकांविषयी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या
माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावर्षी
ध्वजदिन निधी संकलनामध्ये 130 टक्के उद्दिष्ट पूर्ण करुन जिल्ह्याचा नावलौकिक केला
आहे. त्यामुळे सर्वांचे अभिनंदन केले. तसेच पुढी ल वर्षीही त्यासाठी जिल्ह्यातील सैनिकांच्या
जीवन चरित्रावर पुस्तक तयार करावे व पुढील वर्षीच्या कार्यक्रमात बुके न देता
पुस्तके भेट स्वरुपात देण्यात यावीत. या पुस्तकरुपाने पुढील पिढीला सैनिकांनी
केलेल्या कार्याचे महत्व समजेल, असे सांगितले.
निवासी
उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिलीप कच्छवे यांनी संरक्षण दलाचे जवान व अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अहोरात्र
देशाच्या सीमांचे रक्षण करतात. त्यामुळेच
आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या
निधीतून माजी सैनिक, शहीद जवान
अधिकारी यांचे कुटुंबियासाठी विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. हिंगोली
जिल्ह्याने यावर्षी 130 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहेत. त्यामुळे सर्व यंत्रणेचे
अंभिनंदन केले. त्यामुळे पुढील वर्षाचे उद्दिष्ट कालावधीची वाट न पाहता वेळेत
उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले व देशासाठी बलिदान दिलेल्या
सैनिकाप्रती दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. तसेच
यावेळी मातोश्री गंगादेवी देवडा निवासी
आंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चमूने स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर करुन
उपस्थितांची मने जिंकली. यावेळी ध्वजदिन निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेल्या
कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. शहीद सैनिक रणवीर
गणपत भिकाजी यांच्या माता-पित्याचा साडीचोळी देवून सत्कार केला. कार्यक्रमाची सांगता
राष्ट्रगीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश इंगेाले यांनी
केले. तर आभार प्रदर्शन सुरेश भालेराव यांनी केले.
या कार्यक्रमास
माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर तसेच , वीर माता-पिता, माजी सैनिक, माजी
सैनिकांच्या विधवा पत्नी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा गौण
खनिज अधिकारी रविंद्र मारबते, काशिनाथ पाईकराव, कडूजी टिपरे, केशव भडंगे, चंदू
टिपरे, सुबेदार दत्तराव लेकुळे, कॅप्टन केशव जाधव, कल्याण संघटक तुकाराम मुकाडे आदींनी
विशेष सहकार्य केले.
*******
No comments:
Post a Comment