27 December, 2023

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 29 व 30 डिसेंबर रोजी

पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 हिंगोली (जिमाका), दि. 27 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, हिंगोली यांच्यामार्फत दि. 29 व 30 डिसेंबर, 2023 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या रोजगार मेळाव्यात पिपल ट्री व्हेचर्स प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर या कंपनीमध्ये पिकर-पॅकर, वॉयर-हर्नेस मशीन ऑपरेटर च्या 30 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असून या पदासाठी 10 हजार ते 12 हजार वेतन देण्यात येणार आहे. तसेच एक्सेल प्लेसमेंटस छत्रपती संभाजीनगर या कंपनीमध्ये ट्रेनी/ॲप्रेंटशीप इपिपि ट्रेनी पदाच्या 20 जागा भरण्यात येणार असून यासाठी दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा किंवा कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असावे. या पदासाठी मासिक वेतन 11 हजार ते 15 हजार देण्यात येणार आहे.

या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात पिपल ट्री व्हेंचर्स प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर, एक्सेल प्लेसमेंटस छत्रपती संभाजीनगर या कंपनीचे 50 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसूचित केलेली आहेत. जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार https://rojgar.mahaswayam.gov.in  www.ncs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन ॲप्लाय करावे. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा 7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

****

No comments: