11 December, 2023

 

ब्लॉक फेलोच्या नियुक्तीसाठी पात्र इच्छूक उमेदवारांनी

17 डिसेंबर पर्यंत अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 11 : निती आयोग, भारत सरकार राबवित असलेल्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी आकांक्षित तालुका म्हणून केंद्र शासनाने हिंगोली तालुक्याची निवड केली आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी पूर्णतः कंत्राटी तत्वावर केवळ सहा महिन्यांसाठी 55 हजार रुपये मानधन तत्त्वावर 01 (एक) ब्लॉक फेलोची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी दि. 17 डिसेंबर, 2023 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

यासाठी अर्जदार हा पदव्युत्तर शिक्षण धारक असावा. डाटा अनालिसिस व सादरीकरण, सोशल मिडीया, प्रकल्प व्यवस्थापन, संवाद कौशल्य इ. बाबी अवगत असाव्यात. एखाद्या विकास संस्थेत काम किंवा प्रशिक्षण पूर्ण केल्याचा अनुभव असावा, विकास व ग्रामीण क्षेत्र या विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

कार्यालयामार्फत सी.व्ही., बायो-डाटाच्या आधारे मर्यादित उमेदवारांची यादी तयार केली जाईल. या उमेदवारांना ई-मेलद्वारे/दूरध्वनीद्वारे मुलाखतीस उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात येईल. ईच्छुक उमेदवारांनी दि. 17 डिसेंबर, 2023 पर्यंत  dpohingoli@rediffmail.com  या ई-मेलवर अर्ज सादर करु शकतात. अर्जासोबत दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक गुणपत्रिका-प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, ई-मेल पत्ता, दूरध्वनी संपर्क क्रमांकासह बायोडाटा व फोटो असलेले कोणतेही एक शासकीय ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी याबाबतच्या सविस्तर जाहिरातीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली यांच्या https://hingoli.nic.in/ या वेबसाईटचे अवलोकन करावे, असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, हिंगोली यांनी कळविले आहे.

*******

No comments: