हिंगोली
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी
15
डिसेंबर रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल
करिअर सेंटर हिंगोली , श्रीनिवास विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय, वसमत यांच्या
संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन
शुक्रवार, दि. 15 डिसेंबर, 2023 रोजी करण्यात आलेले आहे. हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना
रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा कै. विठाबाई कडतन
महिला सेवाभावी संस्था, गणेशपेठ गणपती मंदिराजवळ, वसमत येथे आयोजित करण्यात आला
आहे.
या रोजगार मेळाव्यात आमधने प्रा. लिमिटेड हैदराबाद (धूत इलेक्ट्रीकल,
डिमार्ट), एक्सेल प्लेसमेंटस प्रा. छत्रपती संभाजीनगर (एनएचके ऑटोमोटीव्ह इंडिया
प्रा.लि.), पिपल्स ट्री ऑनलाईन प्रा.लि. अमरावती (धूत ट्रान्समिशन), सब-केइम्पॅक्ट
सोलूशन लि.हैद्राबाद, ग्रामीण शिक्षा फाऊंडेशन अहमदाबाद, निपूण मल्टी सर्विसेस
पुणे (बजाज ऑटो/संतदिप मेटल), मनसा मोटर्स (महिंद्रा) हिंगोली, मनसा मोटर्स
प्रा.लि. (टाटा मोटर्स) हिंगोली, क्रिडेटएक्सेस ग्रामीण लि.हिंगोली, भारत
फायनांन्स लि.हिंगोली, एसबीआय लाईफ इन्शूरंस हिंगोली, रोहन सिक्युरिटी फोर्स
हिंगोली, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपनी व
हिंगोली जिल्ह्यातील शासनाच्या विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी,
पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 1350 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in
/ www.ncs.gov.in या संकेतस्थळावर
अधिसूचित केली असून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावे
व स्वत: मूळ कागदपत्रासह कै. विठाबाई कडतन महिला सेवाभावी संस्था, गणेशपेठ गणपती मंदिराजवळ,
वसमत जि.हिंगोली येथे शुक्रवार, दि. 15 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता स्वखर्चाने
उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनीवर किंवा
7972888970, 7385924589 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ.
राजपाल कोल्हे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment