विविध
शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी
रविवारी
दहा गावात जाणार विकसित भारत संकल्प यात्रा
* सेलसुरा येथील कार्यक्रमास केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची राहणार
प्रमुख उपस्थिती
·
नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 30 : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत
पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प
यात्रा’ ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात
राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत रविवार, दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी जिल्ह्यातील विविध दहा ग्रामपंचायतींमध्ये
चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध
लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे.
रविवार, दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी ही विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोली तालुक्यात सकाळी उमरखोजा व सायंकाळी पळसोना येथे, कळमनुरी तालुक्यात
सकाळी सेलसुरा व सांयकाळी शेवाळा येथे, वसमत तालुक्यात सकाळी दगडगाव व सांयकाळी लोळेश्वर
येथे, औंढा नागनाथ तालुक्यात सकाळी निशाना व सायंकाळी देवाळा तुर्क येथे, सेनगाव
तालुक्यात सकाळी भानखेडा व सायंकाळी माकोडी येथे जाणार आहे.
कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा येथील विकसित भारत संकल्प यात्रा
कार्यक्रमात केंद्रीय श्रम व रोजगार, पर्यावरण,
वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना,
जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल
ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार
के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच
लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान
करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.
यासाठी संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून
योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे .
*******
No comments:
Post a Comment