15 December, 2023

 विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शनिवारी

गावागावात दिली जाणार शासकीय योजनांची माहिती

 

·         नागरिकांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 15 : केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहचाव्यात, तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शनिवार, दि. 16 डिसेंबर, 2023  रोजील जिल्ह्यातील विविध गावागावामध्ये चित्ररथाद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करण्यात येत आहे.

शनिवार, दि. 16 डिसेंबर, 2023 रोजी ही विकसित भारत संकल्प यात्रा हिंगोली तालुक्यात सकाळी खरबी व सायंकाळी खंबाळा येथे, कळमनुरी तालुक्यात सकाळ माळधावंडा, सायंकाळी कोपरवाडी येथे, वसमत तालुक्यात सकाळी पिंपळ चौरे व सांयकाळी लहान येथे, औंढा नागनाथ तालुक्यात सकाळी नांदगाव व सायंकाळी ढेगज येथे, सेनगाव तालुक्यात सकाळी वरुड चक्रपान व सायंकाळी कवडदरी येथे जाणार आहे.

या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.

यासाठी संबंधित गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

          

******* 

No comments: