विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहोचले शासन आपल्या
दारी
· विकसित भारत
संकल्प यात्रेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे नागरिकांना
केले संबोधन
·
उपस्थित मान्यवरांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध
योजनेचा लाभ घेण्याचे केले आवाहन
·
कवरदडी येथील विकसित भारत संकल्प यात्रेत गावऱ्यांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंगोली (जिमाका), दि.
16 :
सेनगाव
तालुक्यातील कवरदडी येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात
आले होते. यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी आमदार रामरावजी
वडकुते, रामदास पाटील सुमठाणकर, सरपंच सुमन कुंदर्गे, उपसरंपच गंगासागर कुंदर्गे, जिल्हाधिकारी
जितेंद्र पापळकर, प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी ए. एल. बोंद्रे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गट विकास अधिकारी कोकाटे, बालविकास
प्रकल्प अधिकारी विवेक वाकडे, विस्तार अधिकारी जारे, काळे, मंडळ अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी खासदार अनिल बोंडे, आमदार तानाजी मुटकुळे,
माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ सर्व वंचित
घटकातील समाजाला मिळवून देण्यासाठी 'विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या गावापर्यंत
येत आहे. शासनाच्या वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न
केले जात आहेत. शेतकरी, कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक
महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे. या सर्व योजनांचा लाभ सर्व वंचित घटकातील
समाजाने घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील गावागावात
फिरणाऱ्या संकल्प यात्रेच्या रथाद्वारे नागरिकांना दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित
केले. यावेळी कवरदडी येथील विकसित भारत संकल्प यात्रेला गावकऱ्यांचा उर्त्स्फूत
प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित
मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड आदी लाभाचे वितरण
करण्यात आले. या संकल्प यात्रेत कवरदडी येथे आयुष्मान भारत कार्ड -40, आधार कार्ड
– 25, आरोग्य तपासणी केलेले लाभार्थी संख्या -210, उज्वला गॅस योजना लाभार्थी संख्या-
80 यासह पीएम किसान सन्मान, स्वनिधी, जनधन
आदी विविध योजनांचा लाभ देण्यात आला. तसेच
यावेळी ड्रोन
दिदी यंत्राद्वारे कोणती कामे करता येतात याबाबतचे प्रात्यक्षिक करुन दाखवण्यात आले.
तसेच आज ही 'विकसित भारत संकल्प यात्रा' हिंगोली तालुक्यातील
खंबाळा, कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी, वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे व लहान, औंढा
नागनाथ तालुक्यातील ढेगज व नंदगाव, सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथेही पोहोचली
आहे. शासनाच्या
वतीने सर्व प्रकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी,
कामगार, महिला तसेच युवा वर्गाच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना शासन राबवत आहे.
या संकल्प यात्रेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना शासनाच्या विविध योजनांचा
लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी पोहोचले आहे.
यावेळी या
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, आयुष्मान
भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ओडीएफ प्लस मॉडेल ग्रामपंचायत, स्वच्छ
भारत मिशन, कृषि विभागाच्या योजना, माय भारत, धरती कहे पुकार के, मेरी कहानी मेरी
जुबानी आदी योजनांची माहिती देण्यात येत आहे. तसेच लाभार्थ्यांच्या यशोगाथा
दाखविण्यात येत असून या योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करणे, त्यांना लाभाचे
वितरण करणे, वंचित लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे. तसेच 'आपला
संकल्प, विकसित भारत' या एलईडी रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही
सांगण्यात आल्या.
वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे येथे सकाळच्या
सत्रात विकसित भारत संकल्प यात्रेत सहायक गटविकास अधिकारी सुनिल अंभुरे, विस्तार अधिकारी
कोकरे, गोलेवार, इतर कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. तर दुपारच्या सत्रात लहान ता.
वसमत येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या एलईडी रथाद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलाश
शेळके, गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, सहायक गटविकास अधिकारी सुनिल अंभोरे, तालुका
आरोग्य अधिकारी काळे, सहायक प्रशासन अधिकारी चिलगर, विस्तार अधिकारी कोकरे, गोलेवार,
सरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सेनगाव तालुक्यातील
वरुड चक्रपान येथे सकाळच्या सत्रात विकसित भारत संकल्प यात्रेत सरपंच माणिकराव देशमुख,
मंडळ अधिकारी, तलाठी, आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी ताई,
ग्रामसेवक, नागरिक उपस्थित होते.
औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज व नंदगाव येथे
विकसित भारत संकल्प शशिकांत वडकुते, संबंधित गावचे सरपंच, तलाठी, आशा वर्कर,
अंगणवाडी ताई, ग्रामसेवक, नागरिक, सर्व विभागाचे
प्रमुख अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
******
No comments:
Post a Comment