निबंध व रांगोळी
स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकाचे वितरण
हिंगोली (जिमाका), दि. 09 : जिल्हा
एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे जागतिक एड्स दिनानिमित्त
दिनांक 8 डिसेंबर, 2023 रोजी एचआयव्ही संसर्गित युवक व युवतींसाठी निबंध व रांगोळी
स्पर्धेचे आयोजन मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात
आले होते. यावेळी एकूण 16 स्पर्धकांनी निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर एकूण 10
स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना प्रथम पारितोषिक
एक हजार पाचशे, द्वितीय एक हजार रुपये, तृतीय 700 रुपये व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दीपक
मोरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुळे
व विहानच्या श्रीमती अलका रणवीर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात
आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संजय पवार, आशिष पाटील, टिना कुंदणानी व सर्व आयसीटीसी स्टाफ यांनी सहकार्य केले.
*******
No comments:
Post a Comment