18 December, 2023

 

जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी

18 ते 26 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन परीक्षा

  • सर्व संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 18 : येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट, 2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या कनिष्ठ सहायक, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या रिक्त पदाच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. या ऑनलाईन परिक्षेचे केंद्र लातूर, बीड, वर्धा, अमरावती व नांदेड या ठिकाणी निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्रानुसार परिक्षेचे वेळापत्रक, पद व परीक्षा केंद्राचे ठिकाण इत्यादीची माहिती घेऊनच परिक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहावेत.

कनिष्ठ सहायक या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 19 डिसेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 1 मध्ये सर्वज्ञ इन्फोटेक अमरावती वऱ्हाडे इंग्लीश स्कूलच्या बाजूला महर्षी पब्लीक स्कूल, नवसारी, अमरावती येथे सकाळी 7.00 वाजता होणार आहे. तसेच शिफ्ट क्र. 2 व 3 मध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक, पीव्हीआर टाकीजवळ, कळंब रोड, लातूर येथे होणार आहे. शिफ्ट क्र. 2 ची परीक्षा सकाळी 11.00 वाजता व शिफ्ट क्र. 3 ची परीक्षा दुपारी 3.00 वाजता होणार आहे. दि. 20 डिसेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 1 मध्ये नागनाथ इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर टेक्नॉलाजी ॲन्ड मॅनेजमेंट, बसस्थानकाच्या मागे, ड्रीम फिटनेस जीमच्या जवळ, बीड येथे सकाळी 7.00 वाजता होणार आहे. शिफ्ट क्र. 2 मध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक, पीव्हीआर टाकीजवळ, कळंब रोड, लातूर येथे सकाळी 11.00 वाजता होणार आहे. शिफ्ट क्र. 3 मध्ये सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी, नेमानी गोडाऊनच्या समोर, बडनेरा रोड, अमरावती येथे दुपारी 3.00 वाजता होणार आहे.

औषध निर्माण अधिकारी या पदाची ऑनलाईन परीक्षा दि. 21 डिसेंबर व दि. 26 डिसेंबर, 2023 या दोन दिवशी होणार आहे. दि. 21 डिसेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 1 व 2 मध्ये ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड येथे होणार असून शिफ्ट क्र. 1 ची परीक्षा सकाळी 7.00 वाजता व शिफ्ट क्र. 2 ची परीक्षा सकाळी 11.00 वाजता होणार आहे. तर दि. 26 डिसेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 1 मध्ये ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड येथे सकाळी 7.00 वाजता होणार आहे. शिफ्ट क्र. 2 मध्ये ऑयन डिजिटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी, एसएसएस इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी, विष्णुपुरी गेट क्र. 18 व 22, नांदेड आणि अरण असोसिएट अमरावती , अरण  ड्रीमलँड रेडिमेड मार्केट, लेन नं. बी-5 नागपूर हायवे, अमरावती येथे सकाळी 11.00 वाजता होणार आहे. तर शिफ्ट क्र. 3 मध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक, पीव्हीआर टाकीजवळ, कळंब रोड, लातूर येथे दुपारी 3.00 वाजता होणार आहे.

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाची परीक्षा दि. 23 व 24 डिसेंबर, 2023 रोजी होणार आहे. दि. 23 डिसेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 1 मध्ये सिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी, नेमानी गोडाऊनच्या समोर, बडनेरा रोड, अमरावती आणि गिरीराज एंटरप्रायजेस अमरावती, तिसरा मजला, बी-3 विंग, ड्रिमलँड बिझनेस पार्क, पंजाब नॅशनल बँकेच्या वर, नागपूर रोड, अमरावती या केंद्रावर सकाळी 7.00 वाजता होणार आहे. शिफ्ट क्र. 2 मध्ये आरजीसी हायटेक डिजिटल झोन नांदेड द्वारा : राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युत नगर, नांदेड या केंद्रावर सकाळी 11.00 वाजता होणार आहे. शिफ्ट क्र. 3 मध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक, पीव्हीआर टाकीजवळ, कळंब रोड, लातूर येथे दुपारी 3.00 वाजता होणार आहे.

दि. 24 डिसेंबर, 2023 रोजी शिफ्ट क्र. 1 मध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक, पीव्हीआर टाकीजवळ, कळंब रोड, लातूर  आणि श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड टेक्नॉलाजी नांदेड, शामल एज्यूकेशनल कॅम्प्स देगाव रोड, नंदला डिग्रस खडकूतच्या समोर, नांदेड या केंद्रावर सकाळी 7.00 वाजता होणार आहे. दुसऱ्या शिफ्टमध्ये स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्नीक, पीव्हीआर टाकीजवळ, कळंब रोड, लातूर येथे सकाळी 11.00 वाजता होणार आहे.

वरील प्रस्तुत पदांची ऑनलाई परीक्षा ही हिंगोली जिल्ह्यामध्ये घेण्यात येणार नसून उक्त नमूद केलेल्या इतर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वरील सर्व पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.hingoli.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. उमेदवारांना या लिंकद्वारे प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेता येतील. तसेच उमेदवारांच्या माहितीसाठी मराठी व इंग्रजी भाषेतील माहिती पुस्तिका www.zphingoli.inwww.hingoli.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संकेतस्थळावर जाऊन आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावेत. तसेच ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांनी त्यांच्या परिक्षेच्या रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे सक्त पालन करणे आवश्यक आहे. जाहिरातीतील नमूद केलेल्या उर्वरित इतर पदाच्या ऑनलाईन परिक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल.

उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

****** 

No comments: