विशेष लेख
सशस्त्र सेना ध्वजदिन
दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र
सेना ध्वजदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी सशस्त्र सेनेचा ध्वज लावून सेनादल
देशासाठी जे कार्य करतात, त्यांच्या दृढ ऐक्याला नागरिक बळकटी देतात. या दिवशी, समाज
सशस्त्र सेना ध्वज निधीस आपला हातभार लावून आजी व माजी शूर सैनिकांच्या प्रती ज्यांनी
देशासाठी आपले जीवन अर्पिले, त्यांचे प्रती नागरिक कृतज्ञता व त्यांची गुणग्राह्यता
व्यक्त करतात. संकलन केलेला निधी युध्दात देशासाठी आपल्या प्राणांची आहूती दिलेल्या
सैनिकांचे युध्दविधवा, अपंग सैनिक, आजी व माजी सैनिक व त्यांचे अवलंबितांच्या पुनर्वसनासाठी
राज्यस्तरावर सैनिक कल्याण विभागाने आखलेल्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो.
यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 लाखाच्यावर आहे. हा कार्यक्रम अर्थपूर्ण होण्याच्या
कामी सर्वांनी उदारतेने व स्वयंस्फुर्तीने आपला सहभाग व सहाय्य करण्याची आवश्यकता आहे.
या सशस्त्र ध्वजदिनाच्या इतिहासाची आपण माहित
करुन घेऊ या !
स्वातंत्र्य
पुर्वीच्या काळात 11 नोव्हेंबर रोजी दरवर्षी पॉपी डे
साजरा करण्यात येत होता. त्या दिवशी पेपर पॉपीज वितरीत करुन निधी गोळा करण्यात येत
होता. ब्रिटीश सैन्यातील माजी जवानांच्या कल्याणकारी कामासाठी या निधीचा वापर करण्यात
येत असे. या निधीतला काही भाग त्या वेळच्या लष्करातील भारतीय वंशाच्या माजी सैनिकांसाठीही
दिला जात. स्वातंत्र्यानंतर पॉपी डे ला काही
उद्देश उरला नव्हता. त्यामुळे याच आधारावर
स्वतंत्र भारतातील माजी सैनिक व अधिकारी आणि त्यांच्या कुटूंबियासाठी निधी जमविण्याची कल्पना पुढे आली, 28 ऑगस्ट,
1949 रोजी संरक्षण मंत्र्याच्या समितीने 1949 सालापासून दरवर्षी 7 डिसेंबर रोजी ध्वजदिन
साजरा करण्याचा निर्णय जाहिर केला.
लष्काराच्या
तिन्ही दलाचे प्रतीक असलेला ध्वज प्रदान करुन त्या निमित्ताने निधी गोळा करण्याच्या
कार्यक्रमाला प्रारंभ केला जातो. त्याची सुरुवात ध्वजदिनाच्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर
पासून होते.
सिमांच्या रक्षणासाठी व देशाचे
स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी त्यांनी आपले जीवन अर्पिले. आता आपली वेळ आहे. आपण
सर्वजण सशस्त्र सेना ध्वज दिन निधीस सढळ हाताने मदत करुन महान राष्ट्रकार्यास हातभार
लावू या …!
अरुण सुर्यवंशी
जिल्हा
माहिती कार्यालय
हिंगोली.
*******
No comments:
Post a Comment