दिव्यांगाना दुर्धर आजारावरील उपचारासाठी अर्थसहाय पुरविण्यासाठी
5 डिसेंबर रोजी लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे होणार निवड
- दिव्यांग
लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 02 : जिल्हा
परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत जिल्हा परिषद स्वउत्पनातून 5 टक्के सेस
दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांगाना दूर्धर आजारावरील उपचारासाठी अर्थसहाय्य
पुरविणे या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील दुर्धर आजार असणाऱ्या दिव्यांग
व्यक्तींकडून सन 2023-24 मध्ये दि. 15 ऑगस्ट, 2023 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले
होते. प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी करुन पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी दि. 5 डिसेंबर, 2023
रोजी सकाळी 11.00 वाजता हिंगोली जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात निवड समितीची
बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही निवड समिती ईश्वर चिठ्ठी (लकी ड्रॉ) मार्फत पात्र
लाभार्थ्यांची निवड करणार आहे.
या बैठकीस संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी किंवा त्यांच्या
प्रतिनिधीस उपस्थित राहण्यास सांगावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment