केंद्रीय
श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव दोन दिवसाच्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर
हिंगोली (जिमाका), दि. 28 : केंद्रीय श्रम व रोजगार, पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्री भूपेंद्र
यादव हे दि. 30 व 31 डिसेंबर, 2023 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार
आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दि. 30 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 8.00 वाजता छत्रपती
संभाजीनगर येथून मोटारीने प्रयाण करुन सकाळी 11.30 वाजता फाळेगाव ता.जि. हिंगोली
येथे आगमन व तेथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी
1.30 वाजता फाळेगाव येथून आडगाव कडे प्रयाण. 1.40 वाजता आडगाव येथे आगमन व 2.30
वा. पर्यंत राखीव. दुपारी 2.30 वाजता आडगाव येथून औंढा नागनाथ कडे प्रयाण. 3.30
वाजता औंढा नागनाथ येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. सांय.
6.30 वाजता औंढा नागनाथ येथून प्रयाण. 7.00 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे
आगमन व राखीव तसेच मुक्काम .
रविवार, दि. 31 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वाजता
पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती. 11.00
वाजता मोटारीने सेलसुरा ता.कळमनुरी जि.हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
वाजता पर्यंत सेलसुरा येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमास
उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता सेलसुरा येथून मोटारीने प्रयाण करुन 1.30 वाजता
शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन. 1.30 ते 2.30 वाजता राखीव. दुपारी 2.30
वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगर कडे प्रयाण.
******
No comments:
Post a Comment