02 December, 2023

 

मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमुळे दि. 7 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात बदल

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 02 :  हिंगोली जिल्ह्यात श्री. मनोज जरांगे पाटील यांची दि. 7 डिसेंबर, 2023 रोजी डिग्रस फाटा हिंगोली येथे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जाहीर सभा आयेाजित करण्यात आली आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यांच्या हिंगोली जिल्ह्यास लागून असलेल्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे.

या कार्यक्रमाचे सभास्थळ हे राष्ट्रीय महामार्ग हिंगोली ते परभणीवर डिग्रस फाटा येथे आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक नियमनासाठी हिंगोली ते औढा मार्गे वाहतूक पूर्णपणे बंद करणे आम्हास आवश्यक वाटते. यासाठी वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग व वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार दि. 7 डिसेंबर, 2023 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 23.00 वाजेपर्यंत जिल्हादंडाधिकारी यांनी त्यांना प्राप्त अधिकाराचा वापर करुन वाहतूक मार्गात बदल केला आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग : दि. 7 डिसेंबर रोजी जिंतूर टी पॉईंट वसमत ते औंढा-हिंगोलीकडे येणारी जड वाहने, नागेशवाडी फाटा ते औंढा-हिंगोलीकडे जाणारी जड वाहने, हिंगोलीकडून औंढा ना. –परभणीकडे जाणारी जड वाहने, औंढा ना. ते हिंगोलीकडे जाणारी जड वाहने, बोरजा फाटा ते हिंगोलीकडे जाणारी पूर्ण वाहने, नरसी टी पॉईंट ते औंढा ना. कडे जाणारी पूर्ण वाहने, लोहगाव ते डिग्रस पाटीकडे येणारी सर्व वाहने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग : नांदेडकडून जिंतूर टी पॉईंट वसमत-औंढा-हिंगोलीकडे येणारी वाहने जिंतूर टी पॉईंट वसमत कौठा पाटी-कुरुंदा-बोल्डा-उमरा फाटा मार्गे हिंगोली जातील. परभणीकडून औंढा मार्गे हिंगोली येणारी वाहने ही झिरो फाटा-नागेशवाडी-वाई शिरळी-बोल्डा-उमरा फाटा मार्गे हिंगोली जातील. अकोला व वाशिमकडून हिंगोली-औंढा मार्गे परभणी जाणारी वाहने ही राष्ट्रीय महामार्गाने उमरा मार्ग-बोल्डा-सिरळी वाई नागेशवाडी मार्गे परभणी जातील. अकोला-वाशिमकडून नांदेडकडे जाणारी वाहने हायवेने बायपास मार्गे हिंगोली जातील. भोसी ते डिग्रस मार्गे हिंगोलीकडे येणारी वाहने ही लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोली जातील. डिग्रस गावातून डिग्रस फाटा मार्गे हिंगोली येणारी वाहने लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोलीकडे जातील. औंढा ते हिंगोली जाणारी हलकी वाहने व मोटार सायकल बोरजा-लोहगाव-केसापूर मार्गे हिंगोलीकडे जातील. औंढा हून कळमनुरी जाणारी हलकी वाहने पिंपळदरी-नांदापूर-उमरा मार्गे कळमनुरी कडे जातील.

वरील दिवशी वाहतूक मार्गात केलेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

******

No comments: