24 April, 2024
हिंगणी गावातील मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी 144 कलम लागू
हिंगोली (जिमाका), दि. 24 : हिंगणी गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, गावातील विविध प्रार्थनास्थळाजवळून ही मिरवणूक काढली जाणार आहे. सध्या लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, या गावातील ही मिरवणूक शांततेत पार पाडली जावी. नागरिकांकडून कायद्याचे पालन व्हावे, यासाठी हिंगणी गावात व परिसरात दि. 28 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 ते दि. 30 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 11 वाजेपर्यंत कलम 144 (1) प्रमाणे संचारबंदी लागू करावी व हिंगणी गावात इतर गावातील लोकांना प्रवेश बंदी करण्याबाबत समितीच्या अध्यक्षांनी विनंती केली आहे.
त्यामुळे हिंगोलीचे उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन मौ. हिंगणी गावात व परिसरात दि. 28 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 ते दि. 30 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 11 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करुन मौ. हिंगणी गावात इतर गावातील लोकांना प्रवेश बंदी केली आहे.
संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यास पुरेसा अवधी नाही, आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असेही आदेशात नमूद केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment