11 April, 2024
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन उमेदवारांकडून छापल्या जाणाऱ्या डमी मतपत्रिका व बॅलेट युनिट तयार करावेत
हिंगोली (जिमाका), दि 11 : जिल्ह्यात 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करूनच उमेदवारांकडून छापल्या जाणाऱ्या डमी मतपत्रिका व डमी बॅलेट युनिट तयार करावेत.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार निवडणुकीच्या मतपत्रिकेवर उमेदवाराचे स्वत:चे नाव, चिन्ह ज्या जागी दर्शविले जाईल त्या माहितीच्या आधारे डमी मतपत्रिका छापण्यास हरकत नाही. तथापि, या डमी मतपत्रिकेमध्ये इतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे, चिन्हे यांचा समावेश असता कामा नये. या डमी मतपत्रिकेचा आकार व रंग खऱ्या मतपत्रिकेशी मिळता-जुळता असता कामा नये, अशी तरतूद आहे. मतदारांच्या शिक्षणासाठी उमेदवार, राजकीय पक्ष डमी बॅलोट युनिट तयार करु शकतात. ही डमी बॅलेट युनिट लाकूड, प्लॉस्टीक किंवा प्लाय बोर्ड बॉक्सचे असू शकते. सदर बॅलेट युनिटचा आकार अधिकृत बॅलेट युनिटच्या निम्या आकाराचा असावा. सदर डमी बॅलेट युनिट तपकिरी, पिवळा किंवा करड्या रंगाने रंगविलेला असावा.
याबाबतचा अधिक तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका-2023 मधील परिच्छेद 10.10.1 व 10.11.1 मध्ये दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणेच डमी मतपत्रिका व बॅलेट युनिट तयार करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment