17 April, 2024
हिंगोली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आज शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी उद्या गुरुवार, दि. 18 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृहात निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत आयकर विभाग, वस्तु व सेवा कर, राज्य उत्पादन शुल्क तसेच बँकेचे, पोलीस विभागाचे व एमसीएमसी विभागाचे नोडल अधिकारी, हिंगोली, वसमत, कळमनुरी येथील सहायक खर्च निरीक्षक यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.
या बैठकीस संबंधित अधिकाऱ्यांनी अद्ययावत माहितीसह वेळेवर उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment