12 April, 2024
मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 12 :- कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्ण-प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्यात लोकसभा निवडणूक 2024 पाच टप्प्यात होणार आहे. पूर्व-प्रमाणित करण्याबाबतचे दिनांक पुढीलप्रमाणे :
टप्पा पहिला – 19.4.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 18.4.2024 आणि 19.4.2024
टप्पा दुसरा – 26.4.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 25.4.2024 आणि 26.4.2024
टप्पा तिसरा – 7.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 6.5.2024 आणि 7.5.2024
टप्पा चौथा – 13.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 12.5.2024 आणि 13.5.2024
टप्पा पाचवा – 20.5.2024, पूर्व-प्रमाणित करण्याचे दिनांक 19.5.2024 आणि 20.5.2024
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment