16 April, 2024
15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदार यंत्राची द्वितीय सरमिसळ
हिंगोली (जिमाका), दि. 16 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीकरिता मतदार संघातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मतदान यंत्राची द्वितीय सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.16) रोजी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या सरमिसळ प्रक्रियेच्या वेळी 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, ईव्हीएम, जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी अब्दुल बारी, यांच्यासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आणि उमेदवाराचे प्रतिनिधी समक्ष पार पडलेल्या द्वितीय सरमिसळ प्रक्रियेनुसार 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघात कोणत्या क्रमांकाचे ईव्हीएम मशिन कोणत्या मतदान केंद्रावर जाणार याची निश्चिती झाली. यावेळी जिल्ह्यातील एका बुथसाठी 3 बॅलेट युनिट (बीयु), 1 कंट्रोल युनिट (सीयु), एक व्हीव्हीपॅट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच 40 टक्के राखीव ठेवण्यात आले आहेत.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment