06 April, 2024
निवडणूक कामी नियुक्त प्रमाणपत्र (EDC) असणाऱ्या कर्मचाऱ्यांना इव्हीएमवर करता येणार मतदान
हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या यादीत नाव असणाऱ्या आणि याच ठिकाणी निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांकडे प्रमाणपत्र (EDC) सोबत असणाऱ्यांना नियुक्ती ठिकाणी इव्हीएमवर मतदान करता येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार कर्मचाऱ्यांची नावे ते निवडणूक कामी नियुक्त आहेत आणि त्यांचे त्याच मतदारसंघातील मतदार यादीत नाव आहे, अशा कर्मचाऱ्यांना इव्हीएमवर मतदान करता येणार असून, त्यांनी मतदानाचा हक्क बजाजावा. मात्र, त्यसाठी निवडणूक कामी नियुक्त त्या मतदान केंद्रावर नियुक्त असल्याचे प्रमाणपत्र (EDC) सोबत असणे अनिवार्य राहील.
तसेच दुसऱ्या टप्प्यात मतदान असणाऱ्या आणि इतर मतदारसंघातून हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणूक कामी नियुक्त असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना दुसऱ्या प्रशिक्षणाच्या दिवशी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment