21 April, 2024
महिला मतदान अधिकारी यांना मतदान यंत्राचे प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि.21 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सखाराम मुळे व नायब तहसीलदार (निवासी) मनोहर नकितवाड, मंडळ अधिकारी संजय वाघमारे यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजी महाराज उद्यान, उमरखेड येथे पार पडले.
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट प्रत्यक्ष हाताळणी व कंट्रोल युनिट हाताळणी प्रशिक्षणाच्या माध्यमातून सर्व बाबीची माहिती देण्यात आली. संकलन केंद्रावर निवडणूक साहित्य आणि तपासणीबाबत माहिती देण्यात आली. या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे बदल झालेले, टपाली मतदान, 85 वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग मतदार तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदार आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या मतदानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सी-व्हीजील ॲप, मतदारांना ‘नो युवर कँडीडेट’यासह विविध ॲपची माहिती देण्यात आली.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment