19 April, 2024
आदर्श आचारसंहितेची प्रकरणे विचारात घेण्यासाठी स्थायी समितीची स्थापना
हिंगोली (जिमाका), दि. 19 : सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांच्या सहकार्याने निवडणूक आचारसंहिता, आदर्श आचारसंहितेच्या अनुपालनाची खात्री करण्यासाठी आणि त्या संहितेच्या उल्लंघनाची विनिर्दिष्ट प्रकरणे विचारात घेण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीमध्ये पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञावंत मोरे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आर. आर. कोरडे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)चे जिल्हाध्यक्ष अंकुशराव बुधवंत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद ऊर्फ बंडू कुटे, उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)चे जिल्हाध्यक्ष अजय सावंत, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोपाल पांडूरंग ढोणे व 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढविणारे सर्व उमेदवार या समितीचे सदस्य असणार आहेत. तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
उपरोक्त समितीमार्फत निवडणुका या निर्भिड व निष्पक्ष वातावरणात पार पडतील तसेच आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही आणि सर्व उमेदवारांमध्ये सहकार्याची भावना राहील, याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष तथा 15-हिंगोली लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment