17 April, 2024
अनाधिकृत शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नयेत
हिंगोली (जिमाका), दि. 17 : खाजगी शाळेस शासनाकडून मान्यता प्राप्त होतात. परंतु नारायणा ग्रुप ऑफ स्कूल हिंगोली या शाळेस शासनाकडून कोणतीही मान्यता मिळालेली नाही. या शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांची दिशाभूल करुन विद्यार्थ्यांचे इयत्ता पहिली ते सातवीची प्रवेश प्रक्रिया सुरु केल्याचे दिसून येत आहे. तसेच वर्तमान पत्रात देखील शाळेची जाहिरात पालकांपर्यंत पोहोचविण्यात आलेली आहे.
नारायणा ग्रुप ऑफ स्कूल हिंगोली या शाळेस कोणतीही मान्यता नाही म्हणून सर्व पालकांनी मान्यता नसलेल्या अनाधिकृत शाळेत विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ नयेत. तसेच प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास स्वत: पालक जबाबदार राहतील, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती, हिंगोली यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment