22 April, 2024
निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करून अहवाल तात्काळ सादर करा - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर
• सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश
हिंगोली (जिमाका), दि.22 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024चे मतदान 26 एप्रिल रोजी होणार आहे. या काळात निवडणूक कर्तव्यावर अनुपस्थित राहणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करून त्याचे अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांना आज दिले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी मतदान होणार असून, या निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कामकाज करण्याचे आदेश यापूर्वीच संबंधिताना देण्यात आले आहेत. मात्र असे असतानाही निवडणुकीच्या कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्यांविरोधात कडक कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये ही कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सहा उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांना दिले आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment