25 April, 2024
हिंगोली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 144 कलम लागू
हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाने दि. 16 मार्च, 2024 लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे.
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये प्राप्त शक्तीचा वापर करुन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 ची प्रक्रिया हिंगोली जिल्ह्यात ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर होणार आहे. त्या ठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्ष कार्यालय, उमेदवारांचे मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे, उमेदवारांचे चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
हे आदेश निवडणुकीचे कामे हाताळतांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दि. 25 एप्रिल, 2024 रोजीचे सकाळी 8 वाजेपासून ते दि. 26 एप्रिल, 2024 रोजी मतदानाची संपूर्ण प्रक्रिया होईपर्यंत अंमलात राहील. तसेच प्रत्येक इसमावर हे आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आदेश दिले आहेत.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment