05 April, 2024
हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हास्तरीय निवडणूक खर्च संनियंत्रण व व्यवस्थापन कक्ष स्थापन
हिंगोली (जिमाका), दि. 05 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 15-हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे निवडणूक खर्च विषयक कामकाजावर संनियंत्रण ठेवण्यासाठी येथील जिल्हा कोषागार कार्यालयात जिल्हास्तरीय निवडणूक खर्च संनियंत्रण व व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
उमेदवारांचे निवडणूक खर्च विषयक पत्रव्यवहारासाठी electionexpdt2024@gmail.com हा ई-मेल तयार करण्यात आला आहे. तसेच निवडणूक खर्च विषयक माहितीसाठी येथील जिल्हा कोषागार कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवडणूक खर्च संनियंत्रण व व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे कक्षाचे पथक प्रमुख माधव झुंजारे यांनी कळविले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment