06 April, 2024
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वैध उमेदवार
हिंगोली (जिमाका), दि.06: हिंगोली लोकसभा मतदार संघात 55 उमेदवारांनी एकूण 78 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी शुक्रवारी (दि.05) छाननीअंती 55 उमेदवारांपैकी 7 जणांचे नामनिर्देशन अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आजघडीला 48 उमेदवार वैध ठरले आहेत. येत्या सोमवारी (दि.08) उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असून, या दिवशी मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह याकामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली होती. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या शेवटच्या दिवसांपर्यंत 55 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरले आहेत.
नामदनिर्देशन अर्ज वैध ठरल्यामुळे खालील उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत.
15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी
अ.क्र. उमेदवाराचे नाव पक्ष
1 श्री. संभाराव ऊर्फ बाबुराव गुणाजीराव कदम शिवसेना
2 श्री. गजानन धोंडबा डाळ बहुजन समाज पार्टी
3 श्री. विजय रामजी गाभणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्किस्ट)
4 श्री. रवी रामदास जाधव अभिनव भारत जनसेवा पक्ष
5 श्री. देशा श्याम बंजारा सामनाक जनता पार्टी
6 श्री. आष्टीकर पाटील नागेश बापुराव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
7 श्री. अनिल देवराव मोहिते अखिल भारतीय परिवार पार्टी
8 श्री. अल्ताफ अहेमद इंडियन नॅशनल लिग
9 श्री. हेमंत राधाकिशन कनाके राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी
10 श्री. गंगाधर रामराव सावते इंडियन नॅशनल लिग
11 श्रीमती त्रिशला कांबळे बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
12 श्री. प्रकाश मेशराम रणवीर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (ए)
13 श्री. बाबू धनु चव्हाण वंचित बहुजन आघाडी
14 श्री. सुनील दशरथ इंगोले भीम सेना
15 श्रीमती देवसरकर वर्षा शिवाजी बहुजन मुक्ती पार्टी
16 श्री. नामदेव ग्यानोजी कल्याणकर अपक्ष
17 श्री. वसंत किसन पाईकराव अपक्ष
18 श्री. रवी यशवंतराव शिंदे अपक्ष
19 श्री. मनोज आनंदराव देशमुख अपक्ष
20 श्री बाजीराव बाबुराव सवंडकर अपक्ष
21 श्री. अशोक वामन पाईकराव अपक्ष
22 श्री. संजय श्रावण राठोड अपक्ष
23 श्री. अशोक पांडूरंग राठोड अपक्ष
24 श्री. राजू शेषराव वानखेडे अपक्ष
25 श्री. आनंद राजाराम धुळे अपक्ष
26 श्री. रामदास शिवराज पाटील अपक्ष
27 श्री. अब्दुल कदीर मस्तान सयद (गोरेगावकर) अपक्ष
28 श्री. विश्वनाथ भाऊराव फालेगावकर अपक्ष
29 श्री. शिवाजी मुंजाजीराव जाधव अपक्ष
30 श्री. रामप्रसाद नारायण बांगर अपक्ष
31 श्री. धनेश्वर गुरु आनंद भारती अपक्ष
32 श्री. विवेक भैय्यासाहेब देशमुख अपक्ष
33 श्री. रामराव आत्माराव जुंबडे अपक्ष
34 श्री. सर्जेराव निवृत्ती खंदारे अपक्ष
35 श्री. गोविंदराव फुलाजी भवर अपक्ष
36 ॲङ विजय ज्ञानोबा राऊत अपक्ष
37 श्री. दत्ता श्रीकृष्णा सुर्यवंशी अपक्ष
38 श्री. देवजी गंगाराम असोले अपक्ष
39 श्री. अशोक संभाजी ढोले अपक्ष
40 श्री. गोविंद पांडूरंग वाव्हळ अपक्ष़
41 श्री. बाबुराव आनंदराव कदम अपक्ष
42 श्री. सुनील मोतीराम गजभार अपक्ष
43 श्री. महेश कैलास नप्ते अपक्ष
44 श्री. प्रो. डॉ. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर उर्फ (प्रा. के. सागर) अपक्ष
45 श्री. नागोराव पुंजाराम ढोले अपक्ष
46 श्री. अंबादास सुकाजी गाडे अपक्ष
47 श्री. दिवाकर माणिकराव माने अपक्ष
48 श्री. सत्तार पठाण अपक्ष
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment