04 April, 2024
निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांच्याकडून कनेरगाव नाक्याची तपासणी
हिंगोली (जिमाका), दि. 04 : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी आज कनेरगाव नाका येथे भेट देऊन एसएसटी पथकाच्या कामकाजाची तपासणी केली.
यावेळी निवडणूक निरीक्षकांसोबत सहायक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, एसएसटी पथक प्रमुख उपस्थित होते.
हिंगोली लोकसभा मतदार आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना श्री. अली यांनी यावेळी पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना केल्या. श्री. अली यांनी यापूर्वी उमरा फाटा येथील तपासणी नाक्याची तपासणी केली होती. तसेच मतदारसंघातील कोणत्याही नाक्याची ते अकस्मातपणे भेट देऊन तपासणी करणार असून, आदर्श आचासंहितेचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, याबाबतची ते तपासणी करत आहेत. तपासणी नाक्यावर कोणत्याही प्रकारे पथकाकडून दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी सांगितले.
निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत पथक प्रमुखांची बैठक
निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शुक्रवार दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हास्तरीय पथक प्रमुख व खर्च तपासणी पथक आणि मतदारसंघातील वसमत, हिंगोली आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील सहायक खर्च अधिकारी व खर्च पथकाची आढावा बैठक घेणार आहेत.
या बैठकीला येताना सर्व पथक प्रमुख तसेच सहायक खर्च अधिकारी, खर्च पथकांनी येताना संपूर्ण माहिती सोबत ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या तपशीलाचा आढावा ते घेणार आहेत.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment