04 April, 2024
हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 42 उमेदवारांकडून 52 अर्ज दाखल
• 8 उमेदवारांना 25 नामनिर्देशन पत्राचे वितरण
• आज होणार नामनिर्देशन अर्जाची छाननी
हिंगोली (जिमाका), दि. 04 : हिंगोली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी आज दि. 4 एप्रिल रोजी 42 उमेदवारांकडून 52 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन प्रक्रियेला गुरुवार, दि. 28 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या मतदार संघासाठी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आज नामनिर्देशनपत्र वितरण व स्विकृतीच्या पाचव्या दिवशी 8 उमेदवारांना 25 अर्जांचे वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 111 इच्छुक उमेदवारांना 399 नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. आज शेवटच्या दिवशी 42 उमेदवारांनी 51 नामनिर्देशन अर्ज दाखल केली आहेत. त्यामुळे आतापर्यंत दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जांची संख्या 77 झाली आहे. आज दाखल केलेल्या नामनिर्देशन अर्जाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
श्री. आनंद राजाराम धुळे (अपक्ष) यांनी एक अर्ज, श्री. संभाराव ऊर्फ बाबूराव गुणाजीराव कदम (शिवसेना) यांनी चार, श्री. हेमंत राधाकिशन कनाके (राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी) यांनी एक, श्री. शिवाजी नथू शिंदे (अपक्ष) यांनी एक, श्री. रामदास शिवराज पाटील (अपक्ष) यांनी एक, श्री. गजानन धोंडबा डाळ (बहुजन समाज पार्टी) यांनी एक, श्री. अ.कदीर मस्तान सय्यद (गोरेगावकर) (अपक्ष) यांनी एक, श्री. विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर (अपक्ष) यांनी एक, श्री. शिवाजी मुंजाजीराव जाधव (अपक्ष) यांनी एक, श्री. विजय माणिका बलखंडे (बहुजन समाज पक्ष) यांनी एक, श्री. विजय माणिका बलखंडे (अपक्ष) यांनी एक, श्री. गंगाधर रामराव सावते (इंडियन नॅशनल लिग) यांनी एक, श्री. रामप्रसाद नारायण बांगर (अपक्ष) यांनी एक, श्री. अनिल देवराव मोहिते (अपक्ष) यांनी एक, श्रीमती त्रिशला कांबळे (बहुजन समाज पार्टी आंबेडकर) यांनी दोन, श्री. धनेश्वर गुरु आनंद भारती (अपक्ष) यांनी एक, श्री. विवेक भैय्यासाहेब देशमुख (अपक्ष) यांनी एक, श्री. प्रकाश मेशराम रणवीर (रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया ए.) यांनी एक, श्री. रामराव आत्माराम जुंबडे (अपक्ष) यांनी एक, श्री. बाबू धनू चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) यांनी दोन, श्री. सर्जेराव निवृत्ती खंदारे (अपक्ष) यांनी एक, श्री.गोविंदराव फुलाजी भवर (अपक्ष) यांनी एक, ॲड. विजय ज्ञानबा राऊत (अपक्ष) यांनी एक, श्री. दत्ता श्रीकृष्ण सुर्यवंशी (अपक्ष) यांनी एक, श्री. देवजी गंगाराम आसोले (अपक्ष) यांनी एक, श्री. विजय गाभणे (भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी) यांनी एक, श्री. शंकर सिडाम (भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी) यांनी एक, श्री. अशोक संभाजी ढोले (अपक्ष) यांनी दोन, श्री.अशोक संभाजी ढोले (रिपब्लीकन पक्ष खो. रिपाई) यांनी एक, श्री. गोविंद पांडूरंग वाव्हळ (अपक्ष) यांनी एक, श्री. बाबूराव आनंदराव कदम (अपक्ष) यांनी एक, श्री. वसंत किसनराव पाईकराव (बहुजन समाज पार्टी) यांनी एक, श्री. सुनिल मोतीराम गजभार (अपक्ष) यांनी एक, श्री. महेश कैलास नप्ते (अपक्ष) यांनी दोन, प्रा.डॉ. आश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर ऊर्फ प्रा. के. सागर (अपक्ष) यांनी एक, श्री. नागोराव पुंजाराव ढोले (अपक्ष) यांनी एक, श्री. अंबादास सुकाजी गाडे (अपक्ष) यांनी एक, श्री. गजानन काळबा घोंगडे (अपक्ष) यांनी एक, श्री. सुनिल दशरथ इंगोले (भिमसेना) यांनी एक, श्री. दिवाकर माणिकराव माने (अपक्ष) यांनी एक, श्री. सत्तार पठाण (अपक्ष) यांनी दोन, सरोज नंदकिशोर देशमुख (अपक्ष) यांनी एक, देवसरकर वर्षा शिवाजी (बहुजन मुक्ती पार्टी) यांनी एक आणि श्री. उत्तम मारोती धाबे (अखंड हिंद पार्टी) यांनी एक नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्यासह याकामी नियुक्त अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
उद्या शुक्रवार, दि. 5 एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 8 एप्रिल 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment