24 April, 2024
प्रभातफेरीद्वारे हिंगोलीत मतदान जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 24 : लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक 26 एप्रिल, 2024 रोजी सकाळी 7 ते 6 पर्यत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आज आयोजित करण्यात आलेल्या मतदान जनजागृती रँलीला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.
यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय आधिकारी नवनाथ वगवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, आदर्श आचार संहिता अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी तथा मुख्याधिकारी अरविंद मुंढे, स्विप समितीचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी गंगाधर बिरमवार, स्वीप समितीचे प्रा. माणिक डोखळे, सुदर्शन सोवितकर, विनोद चव्हाण, कुंडलीक शिंदे, राजकुमार मोरगे, अनिकेत देशमुख, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रॅलीमध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, शिक्षकवृंद, महाविद्यालयीन विद्यार्थी, आरोग्य विभागातील शिकाऊ नर्स, नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
या रॅली दरम्यान कला पथकाद्वारे मतदान जनजागृतीपर गीते गाऊन मतदानाचा हक्क बजावण्याबाबत संदेश देण्यात आला. ही रॅली उपविभागीय अधिकारी कार्यालय येथून सुरु होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पोस्ट ऑफिस ते भारतीय विद्या मंदिर शाळा मार्गे जवाहर रोड ते शेवटी गांधी चौक येथे हिंगोली येथील रत्नाकर महाजन यांच्या द्वारे" मतदान जनजागृतीची" सामूहिक शपथ घेण्यात आली व कलापथकाचे सुर्यप्रकाश दांडेकर व संच यांनी मतदान जनजागृतीपर गीत सादर केले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करून मतदान जनजागृतीपर संदेश दिला.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment