23 April, 2024
तिसऱ्या तपासणीतील निवडणुकीचे दैनंदिन लेखे सादर न केलेल्या दोन उमेदवारांना नोटीस
• तातडीने खुलासा सादर न केल्यास उमेदवारांवर होणार कारवाई
हिंगोली (जिमाका), दि. 23 : 15-हिंगोली लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणूक खर्च नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवाराचा होणारा दररोजचा खर्च सनियंत्रण पथकास दि. 23 एप्रिल, 2024 सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
परंतु गजानन धोंडबा डाळ आणि महेश कैलास नप्ते या उमेदवारांनी अद्याप नोंदवही व खर्चाचे प्रमाणके सादर केलेली नाहीत. त्यामुळे निवडणूक खर्चाच्या निर्देशांचे संकलन विभाग सी (1) पृष्ठ क्रमांक 76, 77 मधील निर्देशानुसार व भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार न्यायालयात तक्रार नोंदविण्याची तरतूद आहे.
त्यामुळे ही नोटीस प्राप्त झाल्यानंतर तातडीने खुलासा सादर करावा अन्यथा आपणाविरुद्ध भारतीय दंडसंहिता 171 (1) नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment