24 April, 2024
‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ अंतर्गत काढलेली सेल्फी शेअर करा
हिंगोली (जिमाका), दि. 24: लोकसभा निवडणुकीतील प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया म्हणजेच लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव आपल्याकडे शुक्रवार, दि. 26 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी दि. 26 एप्रिलला आपल्या आई-बाबा, ताई-दादा तसेच आजी आजोबांनी मतदान केल्याची निशाणी अर्थातच बोटाला लावलेली शाई दाखवत विद्यार्थ्यांसोबतचा सेल्फी आपापल्या शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करावा, असे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांकडून त्यांच्याच नातेवाईकांसोबतचे मतदान केल्याचे हे सर्व सेल्फी शिक्षकवृंदांनी केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय व्हाट्सअप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात शेअर करावेत. तसेच आपापल्या फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी समाज माध्यमावर #चुनाव का पर्व, देश का गर्व या हॅशटॅगसह अपलोड करावेत, असे आवाहनही स्वीपच्या नोडल अधिकारी यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment