14 April, 2024
निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी दक्ष रहा -- सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सखाराम मुळे
• उमरखेड येथे टपाली मतदान अधिकारी-कर्मचारी यांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि 14: हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड विधानसभा मतदार संघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी उपविभागीय कार्यालयात टपाली मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला.
यावेळी तहसीलदार आर.यु.सुरडकर, नायब तहसीलदार कावरे उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत व पारदर्शकपणे पार पाडावी. यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांनी केले.
15-हिंगोली लोकसभा मतदार संघात 82-उमरखेड विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहे. उमरखेड तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये टपाली मतदानाशी संबंधितांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. निवडणूक आयोगाने आवश्यक गोष्टीची पूर्ण पूर्तता करण्यास अधिन राहून टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
इडीसी व टपाली मतदान
टपाली मतदानासाठी नमुना फॉर्म 12 ए विहित कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत विधानसभा मतदारसंघ क्रमांक, मतदार यादी, भाग क्रमांक, मतदार यादीतील क्रमांक, तसेच नेमणूक आदेश, निवडणूक ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. अर्ज सादर करणे तसेच अर्जात काही दुरुस्ती असल्यास ती पूर्ण करणे ही प्रक्रिया उमेदवारी माघार घेण्याच्या दिनांकापूर्वी पूर्ण होणे आवश्यक राहील. फॉर्म नंबर 13 ए, 13 बी, 13 सी, 13 डी, आणि पोस्टल मतदान घोषणा पत्र आणि ओळखीचा पुरावा आणि मतदान नोंदवहीचा पुरावा, ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच यामध्ये अनुक्रमांक, नाव, यादी क्रमांक व्यवस्थित टाकावा. इडीसी व टपाली मतदानासाठी एकूण 193 लोकांचे मतदान आहे.
नमुना 13 ए मधील घोषणापत्र भरून त्यावर स्वाक्षरी करावी. उपस्थित राजपत्रित अधिकारी मतदाराचे ओळखपत्र तसेच टपालीमधील पत्रिका क्रमांक नमुना 13 ए मध्ये नोंदविला आहे, याची खात्री करून घोषणापत्र साक्षांकित करतील. मतदार हा मतदान कक्षात जाऊन नमुना 13 बीच्या आतील लिफाफ्यावर मतपत्रिका क्रमांक नमूद करेल व आपल्या पसंतीच्या उमेदवारासमोर खूण करून गोपनीयरीत्या मतदान करतील.
मतदान केलेली मतपत्रिका नमुना 13 ए यातील लिफाफ्यावर टाकून सीलबंद करा, नमुना 13ए मधील घोषणापत्र व मतपत्रिका असलेल्या नमुना 13 बी हे दोघांना मोठा लिफाफा नमुना 13 सीमध्ये ठेवून बाहेरील लिफाफा सीलबंद करावा. नमुना 13 सी लिफाफा सुविधा केंद्रावरील पेटीत टाकावा लागतो, असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सखाराम मुळे यांनी सांगितले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment